पिंपरी चिंचवडमध्ये स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; 5 कामगार भाजले - Gas Cylinder Blast - GAS CYLINDER BLAST
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 21, 2024, 4:28 PM IST
पुणे GAS CYLINDER BLAST : पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध नगरमध्ये आज सकाळी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या गॅस सिलेंडर स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पिंपरी बौद्ध नगर बिल्डिंग नंबर 16 मध्ये हा गॅस सिलेंडर स्फोट झाला. 16 नंबर बिल्डिंग मधील एका रूममध्ये हे कामगार एकत्र राहतात. आज सकाळी साडेपाचच्या दरम्यान कामगार स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरची गॅस गळती होऊन हा स्फोट झाला. या स्फोटात मनोज कुमार, धीरज कुमार, गोविंद राम, राम चेलाराम आणि सत्येंद्र राम हे पाच कामगार गंभीर जखमी झालेत. जखमींवर महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.