जुन्नरमधून दहा बिबट्यांचं गुजरातला स्थलांतर; पाहा व्हिडिओ - Leopards From Junnar Relocated - LEOPARDS FROM JUNNAR RELOCATED
🎬 Watch Now: Feature Video


Published : Aug 1, 2024, 10:47 PM IST
पुणे Leopards From Junnar Relocated : जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर आणि ज्वलंत झाली आहे. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे जामनगर (गुजरात) येथील निवारा केंद्रात आज (1 ऑगस्ट) पाठविण्यात आले असल्याचं जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितलं. जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील वनतारा प्राणीसंग्रहालयात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून 4 मादी आणि 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती. हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित ॲम्ब्युलन्स मधून नेण्यात येत आहेत. एका वातानुकूलित ॲम्ब्युलन्समध्ये 5 बिबटे वाहून नेण्याची क्षमता आहे. दोन ॲंम्ब्युलन्समध्ये असे 10 बिबटे तर एक ॲंम्ब्युलन्सही मदतीसाठी सोबत असणार आहे.