जराही नैतिकता उरली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा- सुषमा अंधारे - सुषमा अंधारे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 11, 2024, 8:37 PM IST
बीड Sushma Andhare : सत्तेचा कैफ आणि सत्तेच्या नशेची झापड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर चढलीय. तुम्ही जर महाराष्ट्रात 45 पार असाल तर एका पत्रकाराला का घाबरता? (Nikhil Wagle Attack Case) असा सवाल करत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जराही नैतिकता उरली असेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केलीय. सुषमा अंधारे म्हणाल्या की, एकाच आठवड्यात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. पोलिसांसमोर आणि पोलीस ठाण्यात गोळीबार होतो, याचा अर्थ लोकांना आता पोलिसांचा धाकच राहिला नाही. जे गृहमंत्री अत्यंत संवेदनशीलपणे सांगतात की, गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा मागताल. कदाचित या गृहमंत्र्यांना माणसांमधील आणि जनावरांमधील फरक कळत नाही. एका पत्रकाराला तुम्ही घाबरता कशाला? असा प्रश्नदेखील ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी विचारलाय.