"300 खासदारासंह 200 आमदार असतानाही आमची गरज, एवढं करूनही.."-सुप्रिया सुळे यांचा भाजपाला टोला - MP Supriya Sule
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 19, 2024, 3:31 PM IST
पुणे Supriya Sule Slammed PM Modi : ''निवडणुका आल्या की भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. आज (19 फेब्रुवारी) शिवजयंती आहे. मला वाटलं होतं आज मोदी महाराष्ट्रात येतील. परंतु ते आले नाहीत,'' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे पवार यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुण्यातील शिवाजी महाराज कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर त्या बोलत होत्या. "कांदा निर्यातीचा बंदीचा निर्णय उठवण्यात आलेला आहे. सातत्यानं संसदेत केलेलं भाषण आणि रस्त्यावरील लढाई याचं हे यश आहे. हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार आहे. परंतु आमच्या लढ्याचं हे यश असल्याचं म्हणत अजित पवार यांनासुद्धा सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता सध्या भाजपाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, " 300 खासदार आणि 200 आमदार असणाऱ्या भाजपाला आमच्या नेत्यांची आणि आमची गरज वाटते. यामध्ये आमचे काहीतरी कर्तृत्व आहे. एवढं करूनसुद्धा त्यांना सत्ता येत नाही. याचा विचार त्यांनी करावा. आता तर ते मनसेसोबतसुद्धा बोलत आहेत. म्हणजे त्यांना प्रत्येकाची गरज का वाटत आहे? याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं,'' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.