"अजित दादांनी भाषणातून मान्य केलं की, आमच्या पक्षात..."; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया - Supriya Sule Reaction on Ajit Pawar
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 10, 2024, 7:47 PM IST
पुणे Supriya Sule On Ajit Pawar : पुण्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याहस्ते मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेही व्यासपीठावर उपस्थित होत्या. मात्र पूर्ण कार्यक्रमात त्यांचा अजित पवारांशी कोणताही संवाद झाला नाही. यामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेले दहा-पंधरा वर्षे मीच नगरसेवक निवडून आणतो, मीच सर्व काही करतो, असं स्पष्ट भाषण त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर केलं. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालू ठेवला आहे. त्यामुळं सत्तेचे विकेंद्रीकरण होतं. मी अजित दादांचे आभार मानते की, त्यांनी हे मान्य केलं की, आमच्या पक्षात त्यांना पूर्ण मोकळीक होती. आम्ही सत्तेचं विकेंद्रीकरण करणारे लोकशाहीवादी पक्ष आहोत, हे आजच्या त्यांच्या भाषणातून स्पष्ट ते झालंय.