सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या - Supriya Sule met Sunetra Pawar
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 9, 2024, 11:00 AM IST
पुणे Supriya Sule met Sunetra Pawar : सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. मात्र असं असतानाच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनी गळाभेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्तानं जळोची येथील काळेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलंय. त्यानंतर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनी गळाभेट घेत परस्परांना शुभेच्छा दिल्या. सुनेत्रा पवार या आज दिवसभर विविध शिव मंदिरात दर्शनासाठी भेटी देत होत्या. या दरम्यान, संध्याकाळी त्या जळोची येथील शिवमंदिरात दर्शनासाठी आल्या. त्यावेळी तिथं खासदार सुप्रिया सुळे आल्या. यावेळी दोघींनी परस्परांशी हस्तांदोलन करून गळाभेट घेतली.