"सगळ्यांनीच बदल स्वीकारला...", नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? पाहा व्हिडिओ - Sunetra Pawar - SUNETRA PAWAR

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 9:31 PM IST

पुणे Sunetra Pawar News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आज (30 मार्च) मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सकाळी त्यांनी आंबडवेट गावापासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी बोलत असताना सुनेत्रा पवार यांनी, 'बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांनीच स्वीकारला पाहिजे. हा बदल जर चांगल्यासाठी असेल तर तो सगळ्यांनीच स्वीकारणं गरजेचं आहे' असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला मतदान करण्याचं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं. तसंच यावेळी सुनेत्रा पवार यांनी पिरंगुट परिसरातील विविध सोसायट्यांना भेट देत नागरीकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.