'भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता...', मंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात लावण्यात आलेलं बॅनर चर्चेत - दिपक केसरकर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 18, 2024, 7:45 PM IST
सिंधुदुर्ग Deepak Kesarkar Banner : 'भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता..!!' अशा आशयाचा मजकूर असणारे बॅनर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत. केसकर यांच्याबद्दल त्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. म्हापण, परूळे, भोगवे या परिसरात अज्ञाताकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्या सर्वत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असतानाच मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात असे बॅनर लावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय. मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आल्यानं चर्चेचा विषय ठरत आहे.