नाशिकच्या शिवजयंतीचं खास आकर्षण; डोळ्याचे पारणे फेडणारा शिवरायांचा 65 फूट भव्यदिव्य पुतळा - नाशिक शिवजयंती
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 18, 2024, 10:40 PM IST
नाशिक 65 Feet Statue of Chhatrapati Shivaji Maharaj : नाशिक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. ठिकठिकाणी शिवरायांनी डोळ्यासमोर ठेऊन विविध देखावे साकारण्यात आले आहेत. तसंच नाशिकच्या अशोकस्तंभ मित्र मंडळाच्या वतीनं संस्थापक व्यंकटेश मोरे यांच्या संकल्पनेतून 65 फूट उंच तर 22 फूट रुंद असा भव्य शिवरायांचा पुतळा साकारण्यात आलाय. यासाठी 4 टन स्टील, 3 टन फायबर, 550 किलो निऑन कलरचा वापर केला गेला आहे. तसंच छत्रपती शिवरायांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळ 50 मण्यांची तर कवड्यांची माळ 31 मण्यांची आहे. त्यामुळं या पुतळ्याचे एकूण वजन 7 टन इतके आहे. गेल्या महिन्याभरापासून मूर्ती कलाकार हितेश पाटोळे व हेमंत पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 कारागिरांनी हा पुतळा घडवण्याचं काम केलंय. अशोक स्तंभ परिसरात हा पुतळा उभारण्यात आला असून त्याच्या अवतीभवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवरायांचं हे भव्य रूप डोळ्याचं पारणं फेडणारं असल्याची प्रतिक्रिया नाशिककरांकडून येत आहे.