अशी देण्यात येते छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना, पाहा व्हिडिओ - राज्यात शिवजयंतीचा उत्साह
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 19, 2024, 2:20 PM IST
पुणे Chhatrapati Shivaji Maharaj Manvandana : आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं (shiv jayanti 2024) किल्ले शिवनेरीवर (Shivneri Fort) लाखो शिवभक्त दाखल झाले आहेत. सकाळी 8 वाजता किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मस्थानी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गाण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत तसंच 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकानं वाजवून सलामी दिली आणि त्यानंतर पोलीस पथकाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध मर्दानी खेळही शिवभक्तांकडून सादर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध नेते मंडळी तसेच पदाधिकारी हे उपस्थित होते.