नवीन शैक्षणिक संकुल तत्काळ सुरू करा अन्यथा...; शिर्डीतील सर्वपक्षीय तरुणांचा साईसंस्थानला इशारा - New Educational Complex In Shirdi - NEW EDUCATIONAL COMPLEX IN SHIRDI
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/03-07-2024/640-480-21861782-thumbnail-16x9-shirdi-news.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jul 3, 2024, 8:12 PM IST
शिर्डी (अहमदनगर) New Educational Complex In Shirdi : शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं नवीन शैक्षणिक संकुल गेल्या दिड-दोन वर्षांपासून बांधून पूर्ण झालं आहे. मात्र, आजही ते विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही. साईबाबा संस्थानने हे शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांसाठी तत्काळ खुलं करावं. अन्यथा 11 जुलै रोजी विविध स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा, शिर्डीतील सर्वपक्षीय तरुणांनी दिला आहे. साईबाबा संस्थानने पाच एकर जागेवर जवळपास दिडशे कोटी रुपए खर्च करून अद्यावत शैक्षणिक संकुलाची उभारणी केली आहे. या संकुलाचं काम पुर्णत्वास जावून जवळपास दिड-दोन वर्षे झाली आहेत. तरी या संकुंलाचा वापर अद्याप सुरू झालेला नाही. यामुळं आजही जुन्या इमारतीत जागेअभावी दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू आहे. नवीन संकुल सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. विद्यार्थ्यांसाठी या संकुलाचा वापर तत्काळ सुरू करावा, या मागणीसाठी शिर्डी ग्रामस्थ नितीन कोते, निलेश कोते, तारांचद कोते, रविंद्र गोंदकर, दिपक वारूळे, गोपीनाथ गोंदकर यांच्यासह अनेक तरुणांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेतली आहे.