सातच्या ठोक्यालाच सरसंघचालक मोहन भागवतांनी बजवला मतदानाचा हक्क, काय म्हणाले? - Mohan Bhagwat Casting Vote - MOHAN BHAGWAT CASTING VOTE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 7:40 AM IST

Updated : Apr 19, 2024, 8:14 AM IST

नागपूर Mohan Bhagwat Casting Vote : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी सातच्या ठोक्यालाच आपला मतदानाचा हक्क बजवलाय. शहरातील संघ मुख्यालया जवळ असलेल्या भाऊजी दप्तरी शाळेतील मतदानकेंद्रात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मतदान केलंय. यावेळी त्यांच्यासोबत माजी सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांनीही मतदान केलंय. 100 टक्के मतदानाचा आग्रह डॉ. मोहन भागवत नेहमी धरतात. त्यामुळं त्यांनी ही घड्याळात सातचा ठोका पडताचं थेट मतदानकेंद्र गाठलं आणि आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचं पालन केलंय. तसंच यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. "मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते सर्वांनी पार पाडलं पाहिजे." असंही त्यांनी म्हटलंय. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एनडीएकडून तर विकास ठाकरे महाविकास आघाडीकडून निवडणुक रिंगणात आहेत. 

Last Updated : Apr 19, 2024, 8:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.