thumbnail

मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन सोबत जाणार, मी राष्ट्रवादीत- रोहिणी खडसे - Lok Sabha Elections

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 10:56 PM IST

पुणे Rohini Khadse About NCP : शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्यांच्या सोबत अनेक जण देखील पक्ष प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत रोहिणी खडसे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, त्यांचा निर्णय का झालाय हे त्यांनी स्पष्ट केलं. मी पक्षासाठी इथं थांबली आहे. पवारांनी आम्हाला साडेतीन वर्ष मदत केली आहे. खडसे हेच सगळ्यावर उत्तर देतील. खडसे भाजपा सोबत जात आहेत. यामुळे आपण एकटं पडणार असं वाटतं; पण कार्यकर्ते आणि लोकं आमच्यासोबत आहेत. मी या पक्षात रुळले आहे. प्रत्येक जण माझ्यासोबत आहेत. जिल्ह्यात मी एकटी पडलेली नाही. मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन सोबत जाणार आणि कोणाच्याही विरोधात जाणार नाही, असं यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या.

यांच्यातून फायनल उमेदवार ठरवू : पुण्यात आज मोदीबाग येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर मतदार संघाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी रोहिणी खडसे या देखील उपस्थित होत्या. आजच्या बैठकीबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, आमचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या सोबत जयंत पाटील आणि पवारांनी चर्चा केली. उद्या नावं जाहीर करू तसेच चौधरी, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील यांच्यातील उमेदवार फायनल होईल असं यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.