सलग सुट्ट्यांमुळं साईनगरी शिर्डी भाविकांनी फुलली; पाहा व्हिडिओ - सलग सुट्ट्यांमुळं शिर्डीत गर्दी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/26-01-2024/640-480-20597581-thumbnail-16x9-shirdi-sai-baba-temple-crowd.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jan 26, 2024, 2:12 PM IST
शिर्डी Shirdi Sai Baba Temple Crowd : आज (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिन आणि त्यानंतर शनिवारसह रविवार सलग जोडून सुट्ट्या आल्यानं आज भाविकांची साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांचा ओघ शिर्डीत असतो. मात्र, सलग सुट्ट्या जोडून आल्यानंतर शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. आज प्रजासत्ताक दिनाची तसंच उद्या शनिवार आणि रविवार अश्या सलग तीन सुट्ट्या जोडून आल्यानं भाविकांनी आज साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.आज भाविकांना साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी साधारणतः एक ते दीड तास लागतोय. साईमंदीराकडे जाणारे रस्ते हे गर्दीमुळं फुलून गेले आहेत. दरम्यान, आज दुपारनंतर या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून सोमवारपर्यंत ही गर्दी अशीच टिकून राहील असा अंदाज वर्तविला जातोय.