चंद्रपूरकर रामभक्त सायकलपटूची अयोध्यावारी; हजारो किलोमीटर अंतर करणार पार - मयूर देऊरमल्ले

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 2:13 PM IST

चंद्रपूर Cyclist Mayur Deurmalle : अयोध्या इथं 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. देशभरात याचा उत्साह पाहायला मिळतोय. या निमित्तानं देशभरातील रामभक्त अयोध्याच्या दिशेनं कूच करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील रामभक्त सायकलपटूनं अयोध्यावारीची सुरुवात केलीय. मयूर देऊरमल्ले असं या युवकाचं नाव आहे. 20 वर्षाचा मयूर देऊरमल्ले हा पोंभुर्णा तालुक्यातील धनोटी या गावातील रहिवासी असून तो रामभक्त आहे. तो रामलल्लाच्या दर्शनाला सायकलीनं रवाना झालाय. सुमारे हजार किलोमीटर अंतर पार करत तो दहा दिवसांनी अयोध्येला पोहोचणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्तानं जय श्रीरामचा जयघोष करत अयोध्येकडे निघालेल्या सायकलपटू रामभक्ताला चंद्रपूरकरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. श्रीरामाच्या ओढीनं व त्यांच्याच कृपाशीर्वादानं सर्व विघ्न दूर होत अयोध्येला सुखरूप सकुशल पोहोचू, असा विश्वास त्यानं व्यक्त केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.