गर्दी पाहून राज ठाकरे संतापले, मुख्य पदाधिकारी सोडून सर्वांना काढलं सभागृहाबाहेर; पाहा व्हिडिओ - Raj Thackeray News - RAJ THACKERAY NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 24, 2024, 10:50 PM IST
अमरावती Raj Thackeray In Amravati : सध्या विदर्भ दौऱ्यावर असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूरवरुन शनिवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता अमरावतीत दाखल झाले. पाच वाजता त्यांचा ग्रँड महफिल ईन या हॉटेलच्या सभागृहामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी शेकडो तरुण उपस्थित होते. साडेसहा वाजता राज ठाकरे सभा मंचावर आले. यावेळी राज ठाकरे यांनी, माझा हा दौरा नेमका कशासाठी आहे, हेच मुळात तुमच्या लक्षात आलं नाही. खरंतर विधानसभा निवडणुकीसाठी मला उमेदवारांची चाचपणी करायची होती. मात्र, इतक्या मोठ्या गर्दीत आपलं कोण आणि बाहेरचा कोण हेच कळत नाही. तुम्ही सांगा आता मी काय बोलू, असं पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुनावलं. राज ठाकरे यांनी सभागृहातील गर्दीसमोर बोलण्यास नकार देताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मनसेच्या बैठकीतून मुख्य पदाधिकारी सोडून इतरांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं.