रुम न देण्याच्या रागातून मद्यधुंद पर्यटकांनी महिलेला गाडीखाली चिरडलं, एकजण पोलिसांच्या ताब्यात - RAIGAD CRIME
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 20, 2024, 1:51 PM IST
रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे मद्यधुंद पर्यटकांनी स्कॉर्पिओनं एका महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून ज्योती धामणस्कर (वय 34) असं मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील काही पर्यटक हरिहरेश्वर येथे रविवारी पहाटे दाखल झाले होते. त्यांनी अभी धामणस्कर यांच्या ममता होम स्टे येथे वास्तव्यासाठी रुमची विचारणा केली. मात्र, यावेळी हॉटेल भाड्याच्या रकमेवरून पर्यटक आणि धामणस्कर यांच्यात वाद झाला. यानंतर पर्यटकांनी धामणस्कर यांना मारहाण केली. सर्वजण पळून जात असतांना ज्योती यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना गाडीखाली चिरडून हे सर्वजण पसार झाले. आसपासच्या गावकऱ्यांनी यातील एका पर्यटकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पर्यटकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.