महापुरानं पुणेकरांचे हाल;आता धरण परिसरात आढळली महाकाय मगर - Pune News - PUNE NEWS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 1:41 PM IST

पुणे GIANT CROCODILE IN PUNE  :  पुणे शहर तसंच आजूबाजूच्या परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. काल पासून पाऊस कमी झाल्यानं धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आलाय. अशातच खडकवासला धरण क्षेत्रातील पाणी ओसरल्यानंतर पुण्यातील वरसगाव धरण क्षेत्रात काल रात्री महाकाय मगर आढळून आली. त्यामुळं एकच खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी धरण क्षेत्रात ही मगर मुक्त संचार करत होती. धरणातील सुरक्षा मंडळाचे कर्मचारी धरणातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी जात असताना त्यांना समोर हलचाल झाल्याचे दिसून आले. त्यामुळं त्यांनी विजेच्या उजेडात पाहिलं असता मगर असल्याचं समजलं.  त्यांनी मगरीचा व्हिडिओ काढला. त्यानंतर नागरिकांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीमनं मगरीला रेस्क्यू केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.