पुणे मेट्रोमुळे रूबी वार्ड ते रामवाडी प्रवास 35 मिनिटांवरून 8 मिनिटांवर - पुणे मेट्रोचे उद्घाटन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 6, 2024, 4:56 PM IST
पुणे Pune Metro Inaugurated : पुणे मेट्रोमुळे रूबी वार्ड ते रामवाडी प्रवास 35 मिनिटांवरून 8 मिनिटांवर येऊन ठेपलाय. याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास कामांना जातय. सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून होतोय. मागील 5 वर्षांत पुण्यात झालेली कामे पुण्याच्या विकासाला गती देणारी ठरली आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली वेगवान पद्धतीनं देशाचा विकास होत आहे, अशी प्रतिक्रिया पुणे मेट्रोतील प्रवाशांनी दिली आहे.
मेट्रोचं उद्घाटन : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचं उद्घाटन आज (6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलं. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते करण्यात आलं. आज रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे उद्घाटन झाले आणि उपस्थित प्रवासी तसंच विविध नेते मंडळी यांच्याकडून 'मोदी, मोदी' नावानं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मेट्रोचं भूमिपूजन आणि उद्घाटन : रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके असून हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत की, ज्यांनी मेट्रोचं भूमिपूजनही केलं आणि आज उद्घाटन देखील केलं असल्याचं यावेळी प्रवाशांनी सांगितलं.