पोलीस अधिकाऱ्यानं तरुणाला दाबायला लावले पाय; आता पुणे पोलिसांनी सांगितलं पाय दाबण्याचं 'हे' कारण - Leg Massage By Young Man - LEG MASSAGE BY YOUNG MAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 3, 2024, 10:05 AM IST
पुणे Leg Massage By Young Man : कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री नाकाबंदीदरम्यान वाहन तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्यानं चक्क एका तरुणाकडून पाय दाबून घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पुन्हा एकदा पुणे पोलिसांवर टीका होऊ लागली. पण आता त्या व्हायरल व्हिडिओवर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. त्या पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती बिघडली होती, म्हणून त्या तरुणानं पाय दाबून मदत केली, असं सांगितलं जात आहे. पुणे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं. दरम्यान अधिकाऱ्यांचा बीपी वाढला होता आणि पायाला मुंग्या आल्यानं त्या तरुणानं मदत केल्याचं स्पष्टीकरण पुणे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलं. शनिवारी मध्यरात्री सणसवाडी परिसरातील काही तरुण कारमधून पुण्यात घराकडं जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. पोलिसांनी वाहन चालकास आडवलं आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला. एका पोलीस अधिकाऱ्यानं तरुणाला चक्क पाय दाबण्यास सांगितलं, अशी प्राथमिक माहिती होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.