पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर रंगली सर्वपक्षीय नेत्यांची गप्पांची मैफिल; पाहा व्हिडिओ - PUNE WADESHWAR KATTA

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2024, 10:56 AM IST

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस राहिलेत. मात्र, असं असतानाच राज्यातील टोकाला गेलेली राजकीय परिस्थिती, एकमेकांवर होत असलेली खालच्या पातळीवरील टीका आणि चिखलफेक बाजूला ठेवत पुण्यातील सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी पुण्यातील वाडेश्र्वर कट्ट्यावर एकत्रितपणे नाश्त्याचा आनंद घेतला. वाडेश्र्वर कट्टा म्हणजे राजकीय मंडळींसाठी अराजकीय व्यासपीठ आहे. येथे राजकारणाच्या पलीकडचं नातं जपलं जातं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर सर्वच शहराध्यक्षांनी भाष्य केलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.