शिंदेंच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची जाहीर सभा, सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी - PM Modi Rally in Ramtek - PM MODI RALLY IN RAMTEK
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 10, 2024, 10:22 AM IST
रामटेक PM Modi Rally in Ramtek : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथं जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्रीच नागपुरात दाखल झालेत. नागपुरात दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी कन्हान येथील सभास्थळाची पाहणी केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित राहिले. रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इथं प्रचारसभा पार पडणार आहे. ही प्रचारसभा यशस्वी व्हावी यासाठी केलेल्या तयारीचा तसंच उपलब्ध करुन दिलेल्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः आढावा घेतला. विदर्भात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं सभास्थळाला पावसाचा काही प्रमाणात फटका बसलाय. पावसानं किती नुकसान झालं आणि त्यात सुधारणा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कशी यशस्वी करता येईल, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभास्थळाची पाहणी केली.