Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात; मुंबईकरांच्या संमीश्र प्रतिक्रिया - Petrol Diesel Prices reduced
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 15, 2024, 12:20 PM IST
मुंबई Petrol Diesel Prices : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयानं कपात केलीय. आज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोल डिझेल दर कपातीबाबत केंद्रीय पेट्रोलीयम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटच्या माध्यमातून याची घोषणा केली होती. यानंतर या दरकपातीबाबत मुंबई शहरात नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटतं आहेत. मुंबई शहरात यापूर्वी पेट्रोलचे दर 106.31 रुपये होते, ते आजपासून 104.20 रुपये असणार आहेत. तर डिझेलचे दर 94.27 रुपये होते ते आता 92.27 रुपये असणार आहेत. आज सकाळी सहा वाजेपासून नवीन इंधन दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई शहरातील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकी चारचाकी ग्राहकांनी याविषयी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी केले आहेत. फारसा काही याचा फरक पडणार नसून मात्र निवडणुका आटोपल्यानंतर 4 रुपयांनी पेट्रोल दर वाढतील अशी प्रतिक्रिया वाहन चालक अमजत पठाण यांनी व्यक्त केलीय. तर दुसरे वाहनचालक अमोल काळे म्हणाले की, दोन रुपयांनी पेट्रोलचे दर कमी झाली चांगली गोष्ट आहे. याचा निश्चित फायदा होईल. राजस्थानमध्ये पाच रुपयांना दर कमी झाले हे देखील सांगायलाही ते विसरले नाहीत.