पावसाळी अधिवेशन 2024 : विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, विधानभवनाच्या पायऱ्यांवर प्रचंड घोषणाबाजी - Maharashtra Monsoon Session 2024 - MAHARASHTRA MONSOON SESSION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 3, 2024, 2:33 PM IST
मुंबई Maharashtra Monsoon Session 2024 : पावसाळी अधिवेशनातील आज सहाव्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत सरकारचा निषेध केला. यावेळी राज्यातील शेतकरी आत्महत्या, महागाई, 40 टक्के कमिशनबाज सरकार, स्मार्ट मीटर कुणासाठी, आदानीसाठी, मुंबईतील अनेक प्रकल्प का रखडले? अशी फलकबाजी करत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विधान भावनांचा परिसर दणाणून गेला. विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. "स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी..., 40 टक्के कमिशन खाणाऱ्या सरकारचा अधिक्कर असो..., खोके सरकार हाय... हाय, चंदा दो... धंदा लो..., शेतकरी उपाशी सरकार तुपाशी", अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. यावेळी निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून मोठमोठ्या योजनांची घोषणा केली जाते. मात्र या सरकारला बाय-बाय करण्याची वेळ आली असल्याचं विरोधकानी म्हटलं.