शिरूरमधून अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, उमेदवारीनंतर काय म्हणाले कोल्हे; पाहा व्हिडिओ - Shirur Lok Sabha - SHIRUR LOK SABHA
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 30, 2024, 9:24 PM IST
पुणे : Shirur Lok Sabha : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज शनिवार (दि. 5 मार्च) रोजी लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, अहमद नगरमधून निलेश लंके आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे अशा पाच नावांची घोषणा केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी पक्षाध्यक्षांसह इतर प्रमुखांचेही आभार मानले. (Shirur Lok Sabha candidat) यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलाय हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचेही आभार मानतो असंही कोल्हे यावेळी म्हाणाले आहेत. (Shirur Lok Sabha) 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्षाच्या सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो मला वाटतं की हा पुन्हा पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलाय हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन असंही ते यावेळी म्हणाले आहेत.