विकासाचे मुद्दे ते काँग्रेसकडून होणारे आरोप; भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची विशेष मुलाखत - Murlidhar Mohol Interview - MURLIDHAR MOHOL INTERVIEW
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 23, 2024, 10:04 PM IST
पुणे Murlidhar Mohol Interview : पुणे लोकसभा मतदार संघात (Pune Lok Sabha Constituency) जरी चौरंगी लढत होत असली तरी भाजपा आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाला सुरूवात झालीय. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याकडून "काय म्हणताय पुणेकर" हा नारा दिला जात आहे. तर भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडून "एक मत मोदींना" असा नारा दिला जात आहे. येत्या 13 मे रोजी तारखेला पुणे लोकसभा मतदार संघाचे मतदान होणार असून दोन्ही पक्षाकडून राज्य तसेच देशातील नेते मंडळी पुण्यात प्रचारासाठी येत आहेत.
विविध मुद्द्यांवर भाष्य : पुणे लोकसभा मतदार संघासाठी भाजपानं मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना तसेच वंचितनं वसंत मोरे (Vasant More) आणि आत्ता एमआयएमनं अनिस सुंडके (Anis Sundke) यांना उमेदवारी जाहीर केल्यानं पुण्यात चौरंगी लढत होणार आहे. असं असलं तरी काँग्रेसकडून भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दिवंगत गिरीश बापट यांच्या कार्यालयाची तोडफोड, ब्रिजभूषन सिंह यांचा सत्कार, 10 वर्षात केंद्र सरकारकडून करण्यात आलेली जाहिरातबाजी, तोडाफोडीचं राजकारण असे अनेक मुद्द्यांवर भाजपा तसेच मोहोळ यांच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. तर काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपावर आणि पुण्याच्या मुद्द्यावर पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.