खासदार सुप्रिया सुळेंनी लुटला बॅडमिंटन खेळण्याचा आनंद; पाहा व्हिडिओ - baramati loksabha 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 3, 2024, 5:45 PM IST
पुणे Supriya Sule Playing Badminton : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी बारामतीत बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटलाय. त्यांचा बॅडमिंटन कोर्टवर मुलांसोबत खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लवकरच देशभरात लोकसभा निवडणुका होणार असून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात आलीय. प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला असताना राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडं लागलं आहे. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथील देसाई इस्टेट क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंसोबत बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला.