Bhiwani Mattress Factory Fire : भिवानीतील गादी कारखान्याला भीषण आग, अनेक किलोमीटरवरुन दिसतोय धुराचा लोट - Fire Incident At Bhiwani - FIRE INCIDENT AT BHIWANI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 31, 2024, 9:14 PM IST
चंदीगड Bhiwani Mattress Factory Fire : भिवानी येथील देवसर गावात आज (31 मार्च) एका गादी कारखान्याला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक झाला आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न : आग पसरत असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण जात होते. अशा स्थितीत भिवानी व्यतिरिक्त शिवानी, तोशाम आणि दादरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. परंतु, आग इतकी भीषण आहे की गेल्या २४ तासांपासून त्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
गायही आगीच्या भक्ष्यस्थानी : गादी कारखान्याला आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मॅट्रेस कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे खरे कारण तपासानंतरच समोर येईल. आगीमुळे कारखान्यात ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे कारखान्यात बांधलेली गायही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. माहिती देताना गोरक्षक संजय परमार म्हणाले की, "आगीत अर्धा डझन गायींचा मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी भिवानी जिल्ह्यातील शिवानी व्यतिरिक्त दादरी जिल्ह्यातूनही अनेक वाहने मागवावी लागली."