मनोज जरांगे पाटलांनी कुणाची मागितली माफी? नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - मनोज जरांगे पाटलांनी मागितली माफी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 27, 2024, 8:23 PM IST
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Manoj Jarange Patil News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आई-बहिणीवरून कथित शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की मी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. त्यांनी विधानसभेच्या पटलावर ही गोष्ट मांडली. त्यामुळं मी एवढंच बोलेल की, मी आई-बहिणीवरून बोललो असेल आणि ती गोष्ट फडणवीसांना लागली असेल तर मी त्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तसंच आई बहिणीपेक्षा आम्हाला काही मोठं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारी लोक आहोत. त्यामुळं अनावधानानं कोणाच्याही आई-बहिणीवरून तोंडून काही अपशब्द निघाले असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो", असं ते म्हणाले.