Manoj Jarange On Government : 'सगेसोयरेची अंमलबजावणी केली नाही तर . . .', मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा - Jarange Patil Jalna meeting - JARANGE PATIL JALNA MEETING
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 31, 2024, 4:30 PM IST
जालना Manoj Jarange On Government : "मराठा समाजाच्या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही. ज्याला पाडायचं त्याला पाडा, हे मराठ्यांनी ठरवावं," असं स्पष्ट करत मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका जाहीर केली. मनोज जरांगे पाटलांनी आज (31 मार्च) गावागावातून अहवाल मागवला होता, मात्र हा अहवाल अर्धवट असून गावागावातल्या मराठ्यांपर्यंतचा अहवाल आलेला नाहीये. त्याचबरोबर या अहवालात अनेक चुकाही असल्याचं त्यांनी म्हटलय. त्यामुळं "या अहवालावर मी अपक्ष उमेदवार देऊन मराठा समाजाची फसवणूक करणार नाही. मी मराठा समाजाची हार नाही करणार. त्यामुळं अपक्ष उमेदवार देणार नसून ज्याला पाडायचं त्याला पाडा. तुमच्या बाजूनं जो असेल त्याला निवडून द्या. हे मराठ्यांनी ठरवावं. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाडायचं नाही," असं जरांगे पाटलांनी जाहीर केलंय. परंतु "नंतरही यांनी सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करा," असं म्हणत पुन्हा एकदा जरांगेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय.