महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; पाहताच कर्मचाऱ्यांची बत्ती गुल, पाहा व्हिडिओ - leopard In Mahavitaran Office - LEOPARD IN MAHAVITARAN OFFICE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 10, 2024, 3:48 PM IST
पुणे (खेड) leopard In Mahavitaran Office : राजगुरुनगर खेड येथील महावितरण कार्यालयात बिबट्या (leopard) शिरल्याची घटना समोर आलीय. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात (Mahavitaran Office) मीटर टेस्टिंग रूममध्ये आज सकाळी अकरा वाजता बिबट्या घुसला होता. येथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांनी बिबट्याला दरवाजातून घुसताना पाहिलं होतं. त्यांनी न घाबरता बाहेर येऊन कार्यालयाचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांता शेळके यांच्या धाडसाचं उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी कौतुक केलंय. अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयात कामकाजात व्यग्र असताना घडलेल्या या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. तर वनविभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालं असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.