बिबट्याच्या एंट्रीनं पुण्यात खळबळ; इमारतीत बिबट्या घुसल्यानं नागरिक धास्तावले, पाहा व्हिडिओ - Leopard News - LEOPARD NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 27, 2024, 9:56 PM IST
|Updated : Mar 27, 2024, 10:03 PM IST
पुणे Leopard News : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे एका इमारतीत बिबट्या (Leopard) शिराल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या या इमारतीत असलेल्या गेटमधून आतमध्ये घुसल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं. नंतर स्थानिकांनी वन विभागाच्या रेस्क्यू टीमला बोलवलं. बिबट्यानं या इमारतीत धुमाकूळ घातला. तर बिबट्याला पकडण्याच्या झटापटीत दोन जण जखमी झाले आहेत. बिबट्यानं या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान, या इमारतीत बिबट्या घुसल्याची माहिती क्षणात सगळीकडं पसरली. या ठिकाणी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या इमारतीच्या बाजूला असलेल्या दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पेशंट होते. सुदैवानं बिबट्यानं या दवाखान्यात प्रवेश केला नाही. पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला इमारतीत मधून बाहेर पळवून लावल्यानं मोठी दुर्घटना टळली.