पोलिसांना धमक्या देणाऱ्या आमदार नितेश राणेंवर कारवाई होणार का? 'आयजी' फुलारी म्हणाले, जे घडलं त्याबद्दल माझ्याकडे... - KOLHAPUR ZONE IG SUNIL PHULARI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 9, 2024, 3:53 PM IST
सातारा Kolhapur Zone IG Sunil Phulari : भाजपा आमदार नितेश राणे हे जाहीर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत. २४ ऑगस्ट रोजी इस्लामपूर (ता. वाळवा) येथे आ. राणेंनी पोलीस निरीक्षकाला एकेरी भाषा वापरली होती. गृहमंत्री कोण आहे ते बघ, असा धमकीवजा असा इशाराही दिला होता. यासंदर्भात आ. नीतेश राणेंवर कारवाई होणार का, असा प्रश्न कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना कराडमध्ये माध्यमांनी विचारला. यावेळी आयजी फुलारी म्हणाले की, कायद्याप्रमाणे जी काही कारवाई असेल ती केली जाईल किंवा केली देखील असेल. जे काही घडलं त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही. मी त्याबद्दल 'ऑफ द रेकॉर्ड' बोलू शकतो, परंतु, मीडियासमोर काहीही बोलणार नाही. आयजी फुलारी यांनी दिलेल्या उत्तरावरून पोलीस अधिकाऱ्यांवर सरकारचा मोठा दबाव असल्याचे अधोरेखित होत आहे.