मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेलं पोस्टर पोलिसांनीच फाडलं, कोल्हापूरच्या माणगाव मधील प्रकार - Shaktipeeth Expressway - SHAKTIPEETH EXPRESSWAY

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 3:15 PM IST

कोल्हापूर Shaktipeeth Expressway : नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गावरून वातावरण चांगलच तापलं आहे. हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी राज्यात ठिकठिकाणी लोक आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोशल मीडिया अकाउंटवरून या महामार्रगाबाबत पर्याय काढण्यात येईल असं लिहिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना आणखी दुखावल्या गेल्या. अशातच मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौराही रद्द झाल्यानं वातावरण आणखी तापलं. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या आशियाचं निवेदन शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं देण्यात येणार होतं. मात्र दौरा रद्द झाल्यानं आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी माणगावातील गणपती मंदिर चौकात एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला निवेदन अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मज्जाव केला तसंच या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांचं छायाचित्र असलेले पोस्टर आंदोलकांकडून काढून घेत हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी फाडलं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.