भुसावळ हादरलं! माजी नगरसेवक संतोष बारसेंसह सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या - Firing In Bhusawal - FIRING IN BHUSAWAL

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 11:34 AM IST

भुसावळ Double Murder in Bhusawal :  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं रक्तरंजित झालंय. भुसावळ शहरात बुधवारी (29 मे) रात्री झालेल्या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बारसे आणि सुनील राखुंडे चारचाकीतून राष्ट्रीय महामार्गाकडून जुना सातारा मार्गानं शहरात येत असतांना हल्लेखोरांनी त्यांना अडवून गोळीबार केला. त्यानंतर तेथून पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी घटनास्थळी धाव घेतील. तर या घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.