'मी लढणार आणि जिंकणारच’, पर्वती विधानसभा लढवण्यावर श्रीनाथ भिमाले ठाम - PUNE ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 17, 2024, 10:42 PM IST
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) जाहीर झाल्या असून लवकरच प्रत्येक पक्षाचे उमेदवार देखील जाहीर होणार आहेत. मात्र, असं असलं तरी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांची नाराजगी दूर होताना दिसत नाही. सरकारकडून 27 महामंडळाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात पर्वती मतदार संघातील भाजपाचे इच्छुक उमेदवार श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांचं देखील नाव आहे. पण याबाबत भिमाले म्हणाले की, "मला कोणतीही पक्षातून अधिकृत माहिती आलेली नाही. मी महामंडळ नव्हे तर विधिमंडळाची मागणी केलीय. तसेच मी लढणार आणि जिंकणार" असल्याचं विश्वास त्यांना व्यक्त केलाय. पुण्यात आज भाजपा नेते श्रीनाथ भिमाले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले भिमाले : मी गेल्या 15 वर्षापासून पर्वती मतदार संघातून इच्छुक आहे. यंदा तर मी मोठी तयारी देखील केली आहे. मी पक्षाकडे विधिमंडळाची मागणी केली आहे. मी पर्वती मतदार संघातून इच्छुक असून मी लढणार आणि जिंकणार देखील आहे. तसा मला पूर्ण विश्वास आहे की पक्ष मलाच उमेदवारी देणार आहे.