हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, मनी लाँड्रिंग प्रकरणी झाली होती अटक - Jharkhand CM Hemant Soren
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 4, 2024, 9:30 PM IST
|Updated : Jul 4, 2024, 9:36 PM IST
रांची (झारखंड) Jharkhand CM Hemant Soren : झारखंड मुक्तीमोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुरुवारी दुपारी ४.४५ वाजता राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांनी 31 जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता; तुरुंगातून सुटल्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. यापूर्वी 3 जुलै रोजी झालेल्या इंडिया अलायन्सच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला होता. हेमंत सोरेन यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त, अनेक JMM नेते आणि नुकतेच पायउतार झालेले मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनीही आजच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कल्पना सोरेन यांनी चंपाई सोरेन यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.
हेमंत सोरेन यांना ईडीनं 31 मार्च रोजी मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती; मात्र, अटकेपूर्वी त्यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला होता.