चंद्रपुरात मुसळधार पावसाची हजेरी, उकड्यापासून नागरिकांना दिलासा - Heavy rain in Chandrapur - HEAVY RAIN IN CHANDRAPUR
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 9, 2024, 4:54 PM IST
चंद्रपूर Heavy rain in Chandrapur : आज चंद्रपूर शहरात अचानक मुसळधार पवासानं हजेरी लावलीय. त्यामुळं नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळालाय. चंद्रपूर शहराचा समावेश जगातील सर्वोच्च तापमान असलेल्या ठिकाणांमध्ये होतो. मे महिन्यात हा तापमानाचा उच्चांक 47 डिग्रीच्या पुढं जातो. मात्र, कधी नव्हे ते यावर्षी मे महिन्यात तापमान कमी झाल्याचं दिसून आलंय.अवकाळी पावसामुळं तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे. आज दुपारी भर दुपारी दाटलेल्या ढगांमुळं चंद्रपूर शहरात पावसामुळं गारवा निर्माण झाल्याचं दिसून आलं. तसंच ढगांमुळं सगळीकडं अंधार पसरल्याचं दिसत होतं. अचानक हवामान बदलामुळं चंद्रपूर शहरात पावसाचं आगमन झालंय. त्यामुळं महाराष्ट्राच्या इतर शहरांच्या तुलनेमध्ये चंद्रपूर शहरात कमी तापमान असल्याचं दिसून येतय. त्यामुळं हवेत गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.