सोन्याला झळाळी; तीन दिवसातच प्रतितोळा 1200 रुपयानं वाढले सोन्याचे दर - Gold Rate Increase - GOLD RATE INCREASE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 19, 2024, 11:12 AM IST
जळगाव Gold Rate Increase : चालू आठवड्याच्या पहिल्या तीनच दिवसात सोनं तोळ्यामागं 1200 रुपयानं वाढलं आहे. सोमवारी 73300 रुपये तोळा असलेलं सोनं बुधवारी 74500 रुपयांवर पोहोचलं. गेल्या आठवड्यात सोमवारी सोनं 73300 रुपये तोळा होतं. शनिवारी ते 73100 रुपये झालं. आठवडाभरात घसरण, वाढ होत सोनं 200 रुपयांनी स्वस्त झालं होतं. चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी 200 रुपयांची वाढ होत सोमवारी 73300 रुपये झालं. मंगळवारी चारशे रुपयांनी वाढून 73700 रुपये झालं. पुन्हा तब्बल 800 रुपयांची वाढ होत सोनं बुधवारी 74500 रुपयांवर पोहोचलं. मात्र, गुरुवारी दर स्थीर असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली. आगामी काळात विवाहाच्या तिथी असल्यानं सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.