गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' यंदा विराजमान होणार 'महाकाल' मंदिरात - Ganesh Galli 2024 Decoration - GANESH GALLI 2024 DECORATION
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/31-08-2024/640-480-22340625-thumbnail-16x9-ganesh-galli-2024-decoration.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Aug 31, 2024, 2:10 PM IST
|Updated : Aug 31, 2024, 2:32 PM IST
मुंबई Ganesh Galli 2024 Decoration : लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदा 97 वे वर्ष असून भव्य दिव्य देखाव्यासाठी गणेश गल्लीतील हे मंडळ प्रसिद्ध आहे. या मंडळानं यंदा उज्जैनमधील महाकाल मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं एका महिन्यापासून या भव्य सजावटीसाठी कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्याकडून ही कला साकारत असल्याची माहिती लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कलादिग्दर्शक अमन विधाते यांचे कलाकार विविध कला साकारतात. त्यातच यंदा उज्जैन येथील महाकाल मंदिर साकारण्याची संकल्पना मंडळातील पदाधिकाऱ्यांना सुचली आणि त्याप्रमाणं सजावट करायची ठरवण्यात आलं, अशी माहिती स्वप्नील परब यांनी दिली. तसेच गणेशगल्लीतील गणपती बाप्पा 'मुंबईचा राजा' म्हणून विख्यात आहे. भव्य, उंच अशी बाप्पाची मोहक मूर्ती आणि नेत्रदीपक सजावट पाहण्यासाठी भाविकांची गणेशोत्सवात गणेशगल्लीत रीघ लागते. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांच्याशी ईटीव्ही भारतनं बातचीत करुन त्यांच्या तयारीविषयीची अधिक माहिती जाणून घेतलीय.