निषेध आंदोलनात पुतळ्याचं दहन करताना उडाला आगीचा भडका; बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे चार कार्यकर्ते किरकोळ भाजले - VHP Workers Burned

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 9:18 PM IST

thumbnail
प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावताना घडली दुर्घटना (ETV Bharat Reporter)

नागपूर VHP Workers Burned : वैष्णोदेवी यात्रेसाठी निघालेल्या प्रवासी बसवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात नागपुरात आज (12 जून) बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या बडकस चौकात हे आंदोलन करण्यात आलय. आंदोलनाच्या वेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचं नियोजन केलं होतं. ठरल्याप्रमाणे काही कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याला आगही लावली. मात्र, अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे चार कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत.

या कारणाने झाला असावा हल्ला : निवडणुकीच्या काळामध्ये जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी दहशतवाद्यांच्या धमकीला भीक न घालता पुढे येत मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. मात्र, हे दहशतवाद्यांना आवडलेलं नसेल म्हणून त्यांनी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी हा भ्याड हल्ला केला आहे. भारत सरकार या हल्ल्यानंतर चोख प्रत्युत्तर देईल अशा भावना बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.