"अडवाणी देशाचे लोहपुरूष", उपमुख्यमंत्र्यांनी उधळली स्तुतीसुमने; पाहा व्हिडिओ - उल्हासनगर गोळीबार प्रकरण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 9:17 PM IST

बीड Devendra Fadnavis News : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर लालकृष्ण अडवाणींवर सर्व स्तराहून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अडवाणींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. बीडमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना फडणवीस म्हणाले, "अडवाणी हे खऱ्या अर्थानं देशाचे लोहपुरूष आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची राम जन्मभूमीच्या आंदोलनातील भूमिका आणि देशाचे गृहमंत्री म्हणून कणखर नेतृत्व यासर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते 70 वर्षे राजकारणात सक्रिय होते, मात्र त्यांच्यावर एकही कलंक नाही", असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवर प्रतिक्रिया देत फडणवीस म्हणाले की, "कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे विचार न करता कायदेशीर कारवाई केली जाईल. गोळीबाराची ही घटना पोलीस स्टेशनमध्ये का घडली? गोळीबार का झाला याचं सत्य शोधावं लागेल. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजींना दिले आहेत", असं त्यांनी सांगितलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.