नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार? सुनेत्रा पवार यांच्या भाषणातील विधानामुळं चर्चेला उधाण - सुनेत्रा पवार
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 24, 2024, 10:52 PM IST
पुणे Baramati Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार उभा राहणार अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी बारामतीकरांना साथ देण्याची हाक दिली. त्या म्हणाल्या की, तुम्ही माझ्यावर नेहमीच खूप प्रेम करता. हे प्रेम असंच उदंड राहणार, याची मला खात्री आहे. तुमचं हे प्रेमच माझी उर्जा आणि माझी शक्ती आहे. अजित पवार यांच्यावर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रेम करता. मी तुमची सून असूनही मला तुम्ही जीव लावलाय. याला उतराई होण्यासाठी मी शर्थीचे प्रयत्न करेल. भविष्यातही तुम्ही आम्हाला अशीच साथ देणार, याची मला खात्री असल्याचंही त्या म्हणाल्या.