बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढतीत कोण मारणार बाजी? लवकरच होणार निकाल स्पष्ट - Lok Sabha Election Result 2024 - LOK SABHA ELECTION RESULT 2024
🎬 Watch Now: Feature Video


Published : Jun 4, 2024, 7:48 AM IST
पुणे Baramati Lok Sabha : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल थोड्याच वेळात जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात प्रामुख्यानं लढत झाली. त्यामुळं राज्यातील 48 मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य भांडार येथे पुणे लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. केवळ राज्याचंच नव्हे तर संपुर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडं लागलंय. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद विरुद्ध भावजय च्या लढतील कोण विजयी होणार? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणी केंद्रावर संपूर्ण तयारी करण्यात आली असून याचाच आढावा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं घेतलाय.