अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद; तिघांना अटक - attacked on doctor - ATTACKED ON DOCTOR
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 16, 2024, 7:40 PM IST
अमरावती Attacked on Doctor : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्यावर असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी भूषण यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी प्राणघातक हल्ला केला. बुधवारी रात्री ही घटना घडली असून शहर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर तीन आरोपींना अटक केलीय. बुधवारी रात्री वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी भूषण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्यावर होते. यावेळी वार्ड क्रमांक 16 मध्ये दाखल असणारा रुग्ण आसिफ अली आश्रफली याच्यासोबत असणाऱ्या दहा ते पंधरा जणांनी अचानक डॉ. रवी भूषण यांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना चक्क लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. इतकचं नव्हे तर रुग्णालयातून बाहेर आणून देखील त्यांना मारण्यात आलं. या घटनेमुळं मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच खळबळ उडाली. मारहाणीची ही घटना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणात संबंधित परिसरातील रहिवासी असणारे मोहम्मद अल्मश मोहम्मद राशि (25) मोहम्मद मसब मोहम्मद हनीफ (24) आणि सुफिया नगर येथील रहिवासी मुदत स्थिर खान सादिक खान (23) या तिघांची ओळख पटवून त्यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध शोध घेतला जात असल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांकडून देण्यात आलीय.