"काँग्रेसला मताधिक्य मिळालं हे...", नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण? पाहा व्हिडिओ - Ashok Chavan - ASHOK CHAVAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 17, 2024, 2:21 PM IST
नांदेड Ashok Chavan News : चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला 'रामराम' करत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आले. यानंतर लोकसभा निवडणुकीत नांदेडच्या जागेवर भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज (17 जून) माध्यमांशी संवाद साधत असताना अशोक चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, "भोकर मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून आला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे. प्रमुख कार्यकर्त्यांचा म्हणणं ऐकून घेतलं. पुढची रणनीती ठरवली जात आहे. उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही." पुढं नाना पटोले यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारण्यात आलं असता चव्हाण म्हणाले की, "नाना पटोलेंबद्दल मला काही बोलायचं नाही. जे निकाल लागले ते समोर आहेत. काँग्रेसला मताधिक्य मिळालं, हे मान्य करावं लागेल. पण एकंदरीत मताची आकडेवारी पाहिली तर भाजपाला चांगलं मतदान झालंय. दोघांमध्ये काही टक्क्यांचा फरक आहे. भाजपाचे एकूण मिळालेले मतदान काँग्रेसच्या बरोबरीत आहे."