बलात्कार करणाऱ्या नराधमांना भर चौकात फाशी द्यावी- अण्णा हजारे - Anna Hazare News - ANNA HAZARE NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 22, 2024, 9:18 PM IST
अहमदनगर Anna Hazare News : कोलकाता आणि बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. अत्याचाराच्या घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. गुन्हा करणाऱ्या नराधमांना भर चौकात फाशी दिली तरच या घटनांवर आळा बसेल, असं मत अण्णा हजारेंनी व्यक्त केलंय. तसंच मुलींवर आणि महिलांवर होणारे अत्याचार हे माणुसकीला काळीमा फासणारे आहेत. पोलीस प्रशासनाचे हात बांधलेले असल्यानं ते आरोपींना फाशी देऊ शकणार नाहीत. मात्र, पोलिसांनी हिंमत करून अशा गुन्हेगारांना आज फाशी दिली तर इतरांवरही दहशत निर्माण होईल, हे फार महत्वाचं आहे. असं केलं तरच महिलांवरील अत्याचार थांबू शकतात. या सर्व गोष्टींचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा, अशी माझी विनंती आहे. तसंच याबाबत कडक कायदा करून आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.