"अजित पवार हे चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष, मिटकरी हे घासलेट चोर"-अमेय खोपकर यांचा घणाघात - Amey Khopkar warning To Mitkari

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 9:49 PM IST

सिंधुदुर्ग Amey Khopkar : "राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यास त्यांना रस्त्यावर तुडवलं जाईल," असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अमेय खोपकर यांनी दिला. "मिटकरी हे 'घासलेट' चोर असून त्यांनी राज यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांना मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला. भविष्यात मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्यास त्यांना पुन्हा असाच धडा शिकवला जाईल," असा इशाराही खोपकर यांनी दिला. "राज ठाकरेंचा दबदबा आजही आहे, भविष्यातही राहील," असंही खोपकर म्हणाले. "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी तीनही  विधानसभा मतदारसंघ  मनसे लढणार असून याप्रकरणी मनसेकडून चाचपणी सुरू आहे. त्याचा अहवाल राज साहेबांना दिला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ," असं खोपकर म्हणाले. "अजित पवार हे चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी राज ठाकरेंवर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला. ठगणपतीसाठी येणाऱ्या रेल्वेची तिकिटं 5 मिनिटात कशी पूर्ण बुक होतात, हा प्रश्न आहे. लाखो चाकरमानी गणपतीसाठी गावी जाण्यासाठी त्यांना मुंबईत 500 रुपयांचे तिकीट 3 ते 4 हजार रुपयाला पडतं. खाजगी बसेस सुद्धा जास्त तिकीट दर सांगतात. याची चौकशी होणं गरजेचं आहे. तिकीट बुक झाल्यावर नावांची यादी बाहेर यावी," अशी मागणी मनसे सरचिटणीस अमेय खोपकर यांनी कणकवलीत केलीय. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, अतुल केसरकर, सुधीर राऊळ आदी उपस्थित होते. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.