अशोकराव चव्हाण यांनी भाजपाऐवजी जेलमध्ये जायला पाहिजं होतं - अलका लांबा - भाजपा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-02-2024/640-480-20758612-thumbnail-16x9-alka-lamba-criticized-ashok-chavan.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 15, 2024, 5:44 PM IST
पुणे Alka Lamba criticized Ashok Chavan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. तसंच बुधवारी (14 फेब्रुवारी) त्यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. काँग्रेस सोडून भाजपाची वाट धरल्यानंतर काँग्रेसनं अशोकराव चव्हाण यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांनी देखील चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. पुण्याच्या काँग्रेस भवन येथे अखिल भारतीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "अशोक चव्हाण यांनी भाजपाऐवजी जेलमध्ये जायला पाहिजं होतं. ते जेलमध्ये न जाता भाजपामध्ये गेले आहेत."