संपूर्ण कर्जमाफीसाठी बीडमध्ये अखिल भारतीय किसान सभा आक्रमक, शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन - Farmar Protest In Beed
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 28, 2024, 5:23 PM IST
बीड Farmar Protest In Beed : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचं राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करू शकते अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तविली होती. या मुद्द्याला आता खतपाणी मिळताना दिसत आहे. संपूर्ण कर्जमाफी विनाअट करा, या मागणीसाठी बीडमध्ये अखिल भारतीय किसान सभा आक्रमक झाली आहे. त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकार विरोधात संताप व्यक्त केला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. रब्बी आणि खरीप पिकांचा पीक विमा त्वरित वितरित करण्यात यावा, अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेनं हे आंदोलन केलं. सरकारनं शेतकऱ्यांसंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून ताब्यात घेऊन असा इशाराही शेतकरी नेते अजय बुरांडे यांनी दिला.